⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | अनोळखी महिलेचा व्हिडीओ कॉल घेणे व्यापाऱ्याला 43 लाखात पडला; नेमकं काय घडलं..

अनोळखी महिलेचा व्हिडीओ कॉल घेणे व्यापाऱ्याला 43 लाखात पडला; नेमकं काय घडलं..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२४ । एका व्यापाऱ्याला अनोळखी महिलेचा व्हिडीओ कॉल घेणे चांगलाच महागात पडला आहे. महिलेने व्हिडीओ कॉल करून एका व्यापाऱ्याचा नग्न व्हिडिओ शुट केला. त्यांनतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून तो डिलीट कारण्याच्या नावाखाली तब्बल ४३ लाख ३ हजार ४९० रुपयांची खंडणी उकळली. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने अखेर व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
व्यापारी असलेले केशव महादेव पोळ (वय-६५, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) यांना २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पूजा शर्मा, संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज केले. तसेच व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले असून ते डिलिट करायचे असतील तर पैसे द्या अन्यथा तुमच्या घरी पोलिस पाठवून तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली.

यात व्यापारी पोळ हे घबरल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ४३ लाख तीन हजार ४९० रुपये खंडणीच्या स्वरुपात वेगवेगळ्या बँक खात्यावर स्वीकारले. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने केशव पोळ यांनी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.