⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । एका बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सिनेमागृहात काश्मीर फाईल बघितल्यानंतर जे हेट स्पीच देणारी, दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर व समाज माध्यमावर कडक कायदेशीर कारवाई करा. अशी एकमुखी मागणी जळगाव शहरातील सर्वधर्मीय, राजकीय व सामाजिक संघटनाद्वारे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे करण्यात आली.

या प्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल फोरमच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, वंचित आघाडीच्या नसरुल फातेमा, जनक्रांती मोर्चाचे संस्थापक मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाचे भरत कर्डिले, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, जन क्रांतीचे वाल्मीक सपकाळे, छावा युवा मराठा महासंघाचे अमोल कोल्हे, मानियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल मजहर पठाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष मुजीब पटेल, एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष अहमद शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद, वहिदत ए.इस्लामीचे डॉ. जावेद शेख, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाचे जकी पटेल एम्सचे अतिक शाह, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव प्रतिनिधी शकील बागवान, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान, ईदगाह ट्रस्टचे अनिस शाह, काँग्रेसचे अमजद पठाण, रिक्षा युनियनचे असलम शेख आदी उपस्थित होते.