---Advertisement---
आरोग्य हवामान

नागरिकांनो..! उष्माघातापासून स्वतःच्या आरोग्याची अशी घ्या काळजी, वाचा काय करावे, काय नाही?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान, प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आज आपण उष्माघातापासून स्वतःच्या आरोग्याची अशी काळजी घ्यावी याबाबत जाणून घेणार आहोत..

heat stroke jpg webp

काय करावे
तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी

---Advertisement---

काय करु नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
काम नसेल तर दुपारी १२.०० ते ४ कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---