⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | राष्ट्रीय | टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर ; पहा कोणाला मिळाली संधी…

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर ; पहा कोणाला मिळाली संधी…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCI) दीर्घ चर्चेनंतर संघाची घोषणा केली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने अनेक खेळाडूंशी चर्चा केली. अखेर या 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. T20 World Cup 2024

हार्दिक पांड्याकडे संघात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकात तो संघाचा उपकर्णधार असेल. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संघात यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यात आले आहे. केएल राहुलला संघात संधी मिळालेली नाही. शुभमन गिल, रिंकू सिंग यांचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे.

T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ:
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक
5 जून – टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड
9 जून – टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
12 जून – टीम इंडिया विरुद्ध यूएएसए
15 जून – टीम इंडिया विरुद्ध कॅनडा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.