जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । महात्मा गांधी जयंतीनिमीत्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. यात प्राध्यापकासह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, परिसर तसेच वस्तीगृहाची स्वच्छता करून समाजात स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता राखण्याचे महत्व अधोरेखित केले.या अभियानात अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, प्राचार्या विशाखा गणवीर, प्रा.अश्विनी वैद्य, प्रा.जेसिंथ डाया, प्रा.स्वाती गाडगोने, प्रवीण कोल्हे, आणि डिव्हायना पवार यांची उपस्थिती लाभली.