गुन्हेमहाराष्ट्र

रायगडमध्ये शस्त्रांनी भरलेली संशयित बोट आढळल्याने खळबळ, हालअलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दहशतीचा मोठा कट उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट सापडली असून, त्यात एके-47सह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी ही बोट ताब्यात घेतली असून त्याबाबत माहिती गोळा केली जात आहे. बोट मिळाल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून, कोणतीही मोठी घटना घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी ही शस्त्रे समुद्रमार्गे रायगडावर आणल्याचे समजते. बोटीचा मालक कोण आणि ती येथे कशी पोहोचली याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सुरक्षा कंपनीशी संबंध?
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही ओमानची सुरक्षा बोट आहे, जी रायगड किनाऱ्यावर आली आहे. आता निरुपयोगी ठरलेल्या या बोटीतून AK-47सह अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे खाद्या मोठ्या हल्ल्याचा हा कट होता का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. केंद्रीय यंत्रणांना कळवण्यात आले असून ते तपासावर लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत गृहमंत्र्यांना याबाबत सभागृहाला माहिती देण्यास सांगितले आहे. रायगड जिल्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास सुरू आहे.

समुद्रातून घुसखोरीचा धोका:
देशाच्या सागरी सीमेवरून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा धोका नेहमीच असतो. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळीही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करून मुंबईत सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. अशा स्थितीत ही संशयास्पद बोट सापडल्यानंतर महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली असून राज्य प्रशासनापासून ते केंद्रीय तपास यंत्रणाही सतर्क झाली आहेत. आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल जेणेकरून यामागील संपूर्ण कट उघड होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button