⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

शिस्तभंग प्रकरणी विस्तार अधिकारीसह ग्रामसेवकाचे निलंबन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतीच्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याने कोरोना बाधित सुटीवर असताना ई-टेंडर काढल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा असताना झालेल्या या निलंबन कारवाई मुळे खळबळ उडाली आहे.

प्रशासकिय कामकाजात अनियमितता व गैरवर्तन अणि साहायक गटविकास अधिकारी म्हणुन पदभार असताना परस्पर आदेश पारित करुन शिस्तभंग केल्याप्रकरणी पंचायत समितीतील ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी राजकुमार जैन व कुऱ्हा (काकोडा) येथील ग्रामसेवक विनायक पाटील या दोघांना निलंबनाचे आदेश पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.आर.नागटिळक यांनी सोमवारी काढले आहेत. निलंबन काळात राजकुमार जैन यांचे मुख्यालयात पंचायत समिती मुक्ताईनगर येथे रहाण्याचे आदेशात म्हटले आहे. तत्पुर्वी जैन यांची खाते चौकशी होऊन विविध नोंदी घेऊन अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता.

चौकशी अहवालावरुन जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी हे आदेश पारित केले. हे आदेश प्राप्त होताच खळबळ उडाली.

हे देखील वाचा :