गुन्हेजळगाव शहर

जळगावातील अपहरण झालेल्या दोन्ही बालकांसह संशयितास अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । शहरातील गोपाळपुरा भागातून दोन बालकांचे अपहरण झाल्याची घटना २७ मे रोजी घडली होती. दरम्यान, या दोन्ही बालकांसह अपहरण करणाऱ्या संशयितास अमळनेर शहरातून ताब्यात घेतले आहे.

काजल राजू चव्हाण (वय १०) व मयूर रवींद्र बुनकर (वय ९) असे अपहरण झालेल्या बालकांची नावे आहेत. सुनील पडत्या बारेला (रा. चिरमलीया, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याने बालकांचे अपहरण केले होते. बारेला हा गोपाळपुरा भागातील राजू चव्हाण यांच्या ओळखीचा आहे. तो चव्हाण यांच्या घरी आला होता. ओळखीचा फायदा घेत चिकनचे दुकान दाखवण्याच्या बहाण्याने त्याने दोन्ही बालकांना सोबत नेऊन अपहरण केले होते. यानंतर तो अमळनेर येथे जाऊन राहत होता. तेथे तात्पुरते काम शोधत असताना बालकांनी मालकास दिलेल्या माहितीवरुन त्याचे बिंग फुटले. यानंतर शनिपेठ पाेलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री अमळनेर येथे जाऊन बारेला याला ताब्यात घेतले. अपहरण झालेली दोन्ही बालके देखील सुरक्षीत आहे.

संशयित बारेलाने १५ वर्षापूर्वी सोडले होते गाव

गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी बारेलाचा त्यांच्या गावी तपास केला. या वेळी तो १५ वर्षीपूर्वी गाव सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जळगावातील गोपाळपुरातून अपहरण झालेल्या काजल राजू चव्हाण व मयूर रवींद्र बुनकर या दोन बालकांसोबत संशयित सुनील पडत्या बारेला हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. फुटेजवरुन पोलिस बारेलाचा शोध घेत होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button