सुर्योदयचा बाल वाङ्: मय पुरस्कार खान्देश कवी विलास मोरे यांना जाहिर
.
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । एरंडोल येथील कवी विलास कांतीलाल मोरे यांना सुर्योदय सर्व समावेशक मंडळाचा बाल वाङ्मयातील सौ . लिलाबाई दलिचंद जैन पुरस्कार जाहिर झाला आहे . सन्मानपत्र आणि रक्कम रु ५००० / = पांच हजार मात्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सुर्योदय अखिल भारतीय साहित्य संमेलनात जळगाव येथे जाने २०२२ मध्ये या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहिर केले .
अँड विलास मोरे यांना या वर्षीच महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाला असून त्यांचे संगणकाची गाणी , अतड्म ततड्म शाळेला सुट्टी लागली रे हे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत . तसेच शेत शिवार या नावाने त्यांच्या बाल कवितांचे संपादन पुण्याचे पुण्यामत प्रकाशन यांनी केलेले आहे . संगणकाची गाणी या बातकविता संग्रहाची दुसरी आवृती दितीपराज प्रकाशनने नुकतीच प्रकाशित केली असून त्यांची ‘ तिसरा डोळा ही बालकादंबरी लवकरच उपलद्ध होणार आहे . बाल साहित्यातील योगदानाबद्दल मोरे यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे सतीश जैन यांनी जाहिर केले .
औदुंबर साहित्य रासिक मंच अध्यक्ष अँड मोहन बी शुक्ला, माजी अध्यक्ष विजय जाधव , प्रा . वा . ना . आधळे , विजय भामरे, निंबा बडगुजर , प्रविण महाजन यांनी विलास मोरे यांचे अभिनंदन केले आहे .