जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । ऐकावे तर नवलच.. अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात गेल्या १५ दिवसापासून आकाशातून पिवळ्या रंगाचे ठिपके पडत असल्याने याबाबत परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. काही तज्ज्ञांनी हा आम्लयुक्त पाऊस असल्याचे सांगितले आहे.

मांडळ येथे कोळी वाडा, आंबेडकर पुतळा व काही भागात पिवळ्या रंगाचे थेंब आकाशातून पडत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत. काही ठिकाणी फरशीवर, दुचाकी तर एकाच्या चक्क मोबाइलवर या पिवळ्या रंगाचे ठिपके पडले आहेत. एका महिलेच्या अंगावर पिवळा थेंब पडला. त्या महिलेने त्याचा वास घेण्याचा प्रयत्न केला असता तिला उग्र दर्प जाणवला तसचे मळमळ होऊ लागले. याबाबत सुरेश कांबळे यांनी दखल घेऊन प्रांत सीमा अहिरे यांना ही माहिती कळवली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर यांना कळवून कृषी सहाय्यक ए. बी. पाटील यांना चौकशीसाठी पाठवले. मात्र तोपर्यंत ते पिवळे डाग कोरडे झाले होते. त्यामुळे त्याचा नमुने घेता आले नाही. दरम्यान, प्रा. दिनेश बोरसे यांनी हा आम्लयुक्त पाऊस असू शकतो, असे सांगितले.

हे देखील वाचा :

- प्रवाशांनो लक्ष द्या ! १ जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, भुसावळमार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर ; ९१ जणांना दाखवला बाहेरचा रस्ता
- जळगावकरांनो काळजी घ्या! नवीन वर्षात थंडी हाडे गोठवणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
- योगेश पाटलांनी स्वीकारला नशिराबादच्या नगराध्यक्ष पदाचा कारभार
- उपराष्ट्रपतींचा यांचा जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा.. असं असणार नियोजन?






