जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार (M. Raj Kumar) यांची पदोन्नती झाली आहे. पुढील नियमीत बदली गॅजेटमध्ये त्यांची पोलीस महानिरीक्षक म्हणून वर्णी लागणार आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काही महिन्यांपूर्वीच एम. राज कुमार यांनी पदभार स्वीकारला होता. राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आज मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हे देखील पदोन्नतीसाठी पात्र झाले असून पुढील नियमीत बदली प्रक्रियेत त्यांची वर्णी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून लागणार आहे.