⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | बातम्या | Superhit : काश्मीर फाईल्स, झुंड आणि ताश्कंत फाईल्स ‘या’ ठिकाणी पाहायला मिळणार

Superhit : काश्मीर फाईल्स, झुंड आणि ताश्कंत फाईल्स ‘या’ ठिकाणी पाहायला मिळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित असलेल्या काश्मीर फाईल्स चित्रपटाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड आणि गेल्या वर्षी येऊन गेलेल्या ताश्कंत फाईल्स चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ज्या प्रेक्षकांनी हे तिन्ही सुपरहिट चित्रपट अद्याप पहिले नसतील अशांसाठी हे चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपण झीचे प्रीमियम मेंबर असल्यास आपल्याला एचडी दर्जाचे चित्रपट पाहायला मिळणार आहे.

देशभरात २०२२ सुरु झाल्यापासून एकच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होती तो म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘काश्मीर फाईल्स’. काश्मीरमध्ये राहणाऱ्या पंडितांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणारा आणि सत्यघटना जनतेसमोर मांडण्यात आलेली असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. देशभरातील सर्वच चित्रपटगृहे प्रेक्षकांनी फुल्ल झाले होते. अनेक ठिकाणी तर भाजप आणि विविध सामाजिक संघटना, व्यक्तीकडून संपूर्ण चित्रपटगृह आरक्षित करीत विविध वर्गातील नागरिक, विद्यार्थी यांना चित्रपट मोफत दाखविण्यात आला. काश्मीर फाईल्सवरून देशात राजकीय टीका टिपण्णी तर झालीच सोबत काही राजकारण्यांचे शाब्दिक खटके देखील उडाले.

काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने ताश्कंत फाईल्सची देखील चर्चा होऊ लागली. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा मृत्यू कसा संशयास्पद होता. भारतात तेव्हा राजकीय सत्ता चालविण्यात कोणत्या नेत्यांना रस होता. भारताचे राजकारण कसे चालत होते. लालफितीत बंद करण्यात आलेल्या लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूचे रहस्य जगासमोर मांडणाऱ्या या ताश्कंत फाईल्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहास आठवला. ताश्कंत फाईल्स चित्रपटगृहात फारसा चालला नसला तरी काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने तो पाहण्याची अनेकांची इच्छा झाली.

देशात काश्मीर फाईल्सची चर्चा सुरु होती तेव्हा आणखी एक चित्रपटाची देखील चर्चा होत होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ चित्रपट केव्हा प्रकाशित होणार याची प्रेक्षक पाहत होते. झुंड चित्रपटगृहात झळकल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. सत्य पात्रावर आधारित असल्याने चित्रपटाची मोठी चर्चा झाली. देशात चर्चा झालेले काश्मीर फाईल्स, ताश्कंत फाईल्स आणि झुंड चित्रपट प्रेक्षकांना आता घरबसल्या बघता येणार आहे. ZEE५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहेत. आपण जर या अँपचे प्रीमियम सभासद असाल तर आपल्याला एचडी दर्जाचा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

घरबसल्या आपण मोठ्या स्क्रीनवर देखील या चित्रपटांचा आनंद घेऊ शकणार आहेत. झी५ अँपचे प्रीमियम ग्राहक झाल्यास त्याठिकाणी उपलब्ध असलेले सर्व चित्रपट, मालिका, वेबसिरीज आपल्याला वर्षभर मोफत पाहायला मिळणार आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.