⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

सर्वसामान्यांना झटका! सोयाबीनसह सूर्यफूल तेलाचे दर महागले, आता प्रति किलोचा दर काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । निवडणुकीचे वर्ष म्हणून गेल्या वर्षभरात बऱ्यापैकी नियंत्रणात असलेल्या तेलाचे दर आठवडाभरात वाढण्यास सुरुवात झाली आहे. आठवडाभरात सोयाबीन तेल ५ रुपयांनी तर सूर्यफूल तेल १० रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह कांडला बंदरावरून पुरवठ्यास होणारा विलंब अशी दरवाढी मागील कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे

गेल्या आठवड्यापर्यंत घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचे प्रती पाऊचचे (९०० एमएल) दर ९५ रुपये तर सूर्यफूल तेलाचे दर ९५/९६ रुपये होते. घाऊक बाजारात ते शनिवारी अनुक्रमे १०३ व १०४ रुपये तर किरकोळ बाजारात १०८ रुपये व ११० दहा रुपये झाले. लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या वर्षी केंद्राने साठाबाजीवर नियंत्रण व आयात वाढवून अंकुश ठेवल्याने दर नियंत्रणात होते. गेल्या शनिवारी दरात ही वाढ झाली आहे. –

आणखी ५ रुपये दरवाढ शक्य गेल्या महिन्याभरात तेलाच्या मागणीत मोठी घसरण झाली होती. मात्र, आता पुन्हा मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यासोबत वितरण साखळी प्रभावित झाल्याने दरवाढ होत आहे. ही वाढ आणखी ५ रुपयांपर्यंत होण्याचा अंदाज तेलाचे घाऊक व्यापारी यांनी व्यक्त केला आहे.