जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । येथील आदर्श माहेश्वरी मंडळातर्फे हनुमान जयंतीनिमित्त नुकतंच सुंदरकांड कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी संदीप भुतडा व त्यांच्या ग्रुपने संगीतमय सुंदरकांड सादर केले. भाविक भजनांमध्ये तल्लीन झाले होते. कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा मुंदडा, सेक्रेटरी अरुणा मंत्री, प्रोजेक्ट चेअरमन शर्मिला न्याती, शारदा मंडोरा, गीता जाखेटे, छाया झंवर, शीतल काबरा, रंजना काबरा, अरुणा लढ्ढा, छाया सोमाणी, ज्योती मंडोरा, निर्मला बेहेडे, शीतल मंत्री यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर अध्यक्षा सुवर्णा मुंदडा यांच्यातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले.