---Advertisement---
जळगाव जिल्हा

भुसावळमार्गे मुंबई येथून ‘या’ शहरांसाठी धावणार उन्हाळी गाड्या ; पहा कसं असेल शेड्युल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२४ । उन्हाळी सुट्यांमुळे आणि लग्नसराईमुळे सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून मुंबई येथून गोरखपूर व दानापूरसाठी ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी रेल्वे गाड्या विशेष चालवल्या जाणार आहे, यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

train jpg webp

मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई येथून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीची दखल घेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपूर आणि मुंबई-दानापूर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष ही ०१०८३ विशेष गाडी शनिवार दि. २० एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल.

---Advertisement---

तसेच ०१०८४ विशेष गाडी सोमवार दि. २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुरहून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपुर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबणार आहे. या गाडीला १८ डबे असतील.

तसेच ०१०८५ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून रविवार दि. २१ एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१०८६ विशेष गाडी मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि लोटिट मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ०१०८१ विशेष गाडी रविवार, दि. २१ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता लोटिट मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता दानापूर येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी ०१०८२ विशेष गाडी सोमवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजता दानापुरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता लोटिट मुंबईला पोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे थांबेल

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---