जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२५ । उन्हाळी सुट्यांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना ते बरौनी दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला नंदुरबार, अमळनेर आणि भुसावळ येथे थांबे असतील. तर उत्तर रेल्वेने सुलतानपूर-मुंबई विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला भुसावळ स्थानकांवर थांबा असणार.

उधना-बरौनी विशेष ट्रेन
क्र. ०९०३७ ही विशेष गाडी २० एप्रिल ते २९ जून २०२५ पर्यंत दर रविवारी रोजी ०५.४५ वाजता उधना येथून सुटेल आणि सोमवारी रोजी बरौनी येथे १५.०० वाजता पोहोचेल. क्र. ०९०३८ हीविशेष गाडी २१ एप्रिल ते ३० जून २०२५ या दरम्यान दर सोमवार रोजी १८.३० वाजता बरौनी येथून सुटेल आणि बुधवार रोजी उधना येथे ०४.०० वाजता पोहोचेल.
या गाडीला चलथान, बारडोली, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिनदयाल उपाध्याय जंकशन, बक्सर, आरा, दानापूर, पटना, बख्तियारपूर जंक्शन इथे थांबे असतील.
तर उत्तर रेल्वे मुंबईसाठी २० डब्यांची उन्हाळी विशेष ट्रेन चालवणार आहे. ५ मे पासून सुलतानपूर येथून दर मंगळवारी ०४२१२ आणि मुंबईहून दर बुधवारी ०४२११ ही ट्रेन धावेल. ही ट्रेन लखनऊ, कानपूर, ओरई, झाशी, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, मुंबई येथे जाईल. सुलतानपूरहून पहाटे ४ वाजता तर मुंबईहून दुपारी ४.३५ वाजता सुलतानपूरला रवाना होईल.