⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | सरकारी योजना | तीन मुली असल्या तरी‎ उघडा हे खाते‎, तुमची कन्या २१ व्या वर्षीच होईल लखपती

तीन मुली असल्या तरी‎ उघडा हे खाते‎, तुमची कन्या २१ व्या वर्षीच होईल लखपती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । केंद्र सरकारकडून मुलींच्या भविष्याचा विचार करून काही योजना राबविल्या जात आहे. त्यात एक म्हणजे सुकन्या समृध्दी योजना (Sukanya Samrudhi Yojana). जर तुम्हालाही तुमच्या लेकीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या‎ सुरक्षित रहावे, तिला कधी पैशांची कमतरता जाणवू नये, असे‎ वाटत असेल तर ही योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही‎ तुमच्या कन्येचे भविष्य सुरक्षित करु ‎ शकता. या योजनेंतर्गत तुमची कन्या २१ व्या वर्षीच‎ लखपती बनू शकते. Sukanya Samrudhi Yojana News

विशेष म्हणजे पहिले दोन मुलींचे‎ खाते उघडल्यानंतर करात सवलत मिळत होती. एका मुलीनंतर जुळ्या मुली झाल्या, आता दोघींसाठीही‎ खाते उघडण्याबाबत नवीन‎ नियमानुसार तरतूद करण्यात आली ‎आहे.‎ तीन मुलींना या योजनेचा लाभ‎ घेता येणार आहे. मुलगी दहा वर्षात‎ खाते ऑपरेट करु शकते, असे‎ नियम होता. परंतु, आता सज्ञान‎ झाल्यानंतर म्हणजेच १८ वर्ष पूर्ण‎ झाल्यानंतर खाते ऑपरेट करु‎ शकते. या योजनेत गुंतवणूक‎ केल्यास तुमची कन्या २१ व्या वर्षीच‎ लखपती बनू शकते. जर दररोज‎ ४१६ रुपये जमा केले तर मुलीसाठी‎ ६० लाखापेक्षा जास्त रक्कम बनेल‎ अशा प्रकारे मोठा लाभ मिळू‎ शकेल.

ही योजना बेटी बचाव, बेटी‎ पढाव अभियानाचा एक भाग आहे.‎ योजनंेतर्गत बंॅक किंवा पोस्ट ऑफीसमध्ये खाते उघडता येते. हे‎ खाते २१ वर्षापर्यंत किंवा १८ वर्षानंतर‎ मुलीचे लग्न होईपर्यंत सुरु ठेवता‎ येते. या खात्यात वर्षात कमीत कमी‎ २५० रुपये जमा करणे आवश्यक‎ आहेत. ही रक्कम जमा न झाल्यास‎ खाते डिफॉल्ट मानण्यात येते. नवीन‎ नियमानुसार खात्याला पुन्हा सक्रिय‎ केले नाही. तरीही खात्यात जमा‎ रक्कमेवर व्याज मिळत राहिल.‎ अशा खात्यांवर पोस्ट कार्यालयातून‎ बचत खात्यासाठी लागू व्याज‎ मिळेल. नागरिकांंनी या योजनेचा‎ लाभ घ्यावा, असे आवाहन केले.‎

असे उघडता येईल‎ पोस्टात खाते‎
पोस्ट ऑफिसमधून अर्ज घेऊन‎ आवश्यक दस्ताऐवज जमा करावेत.‎ मुलीच्या जन्माचा दाखला‎ आवश्यक आहे. आई-वडिलांचे‎ ओळखपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड,‎ वाहन परवाना, पासपोर्ट, वीजबिल‎ द्यावे लागेल. बँक किंवा पोस्ट‎ ऑफिसमध्ये कागदपत्रांची‎ पडताळणी झाल्यानंतर सुकन्याचे‎ खाते उघडले जाते. या योजनेचा‎ अनेक कुटुंबांना लाभ मिळत आहे.‎ योजनेतील अडचणी दूर करण्यात‎ आल्या आहेत. जनसामन्यांना या‎ योजनेचा लाभ घेता येणार आहे.‎

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.