⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर येथे तरुणीची आत्महत्या ; घटनास्थळी आढळली सुसाईड नोट

अमळनेर येथे तरुणीची आत्महत्या ; घटनास्थळी आढळली सुसाईड नोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । अमळनेर येथील बंगाली फाईल भागातील २१ वर्षीय तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. भाग्यश्री शांताराम कोळी असे या मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, तरूणीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्यात आई-वडीलांना सुखी ठेवा, असा उल्लेख केला आहे.

रेल्वे स्टेशन समोरील बंगाली फाईल भागातील भाग्यश्री कोळी या युवतीने, घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. तिचे आई-वडील जळगाव येथे राहतात. काही दिवसांपुर्वी ती अमळनेरला आजीकडे आली होती. आजी घराबाहेर बसलेली असताना भाग्यश्रीने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तिचे आई-वडील हातमजुरी करतात. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनास्थळी सुसाईड नोट आढळली आहे. त्यात आई-वडिलांना सुखी ठेवा आणि मला माफ करा असे नमूद केले आहे. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.