---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

..म्हणून मी या थरावर गेलो; स्टेटस ठेवत प्रौढाने उचललं धक्कादायक पाऊल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । जामनेर तालुक्यातील करमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सासऱ्यासह शालकावर गंभीर आरोप करणारे स्टेटस ठेवत एका प्रौढाने आत्महत्या केलीय. दिनकर तुळशीराम पाटील (४०, रा. उमाळा, ता. जळगाव, ह.मु. कवली, ता. सोयगाव) असं आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव असून जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मयताच्या नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेतली होती. .

crime 2 jpg webp webp

जळगाव तालुक्यातील उमाळा येथील रहिवासी असलेले दिनकर पाटील हे गेल्या १७ वर्षांपासून सोयगाव तालुक्यातील कवली येथे राहत होते. त्यांचा सासरच्या मंडळींशी वाद होता, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शुक्रवारी वादातून करमाळा येथे सासऱ्याच्या घरासमोर दिनकर पाटील यांनी विष प्राशन केले. या घटनेनंतर गावातील सरपंचांनी वाहन आणले मात्र रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करीत पाटील यांच्या सासऱ्यांनी सरपंचांच्या वाहनातून त्यांना रुग्णालयात नेऊ दिले नाही, असे पाटील यांचे भाऊ रामचंद्र पाटील यांनी सांगितले. नंतर रुग्णवाहिकेतून दिनकर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले

---Advertisement---

आत्महत्येपूर्वी ठेवले स्टेटस
आत्महत्या करण्यापूर्वी दिनकर पाटील यांनी स्टेटस ठेवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘पोलिस पाटील, प्रेमाखातर सांगत आहे. हाती काहीच येणार नाही. मी आत्महत्या करतोय. सासऱ्याने शिवीगाळ केली व माझी इज्जत पाण्यात घातली आहे. शालक पण ट्रकखाली लोटत होता म्हणून मी या थरावर गेलो. बाईपण त्यांची साथ पकडतेय. मी जीवन संपवतोय, त्यांच्या नावाची चिठ्ठी लिहिली आहे’, असे म्हणत पाटील यांनी सासरे व शालकाचे नाव व्हिडिओमध्ये घेतले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---