---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा जळगाव शहर

जळगावात एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

---Advertisement---

 

crime jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । जळगावातील रामेश्वर कॉलनीत एका २३ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून गुंगीचे औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. महेंद्र अशोक पाटील (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

---Advertisement---

 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र हा शहरातील एका रुग्णालयात कामाला होता. शहरातीलच एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. दरम्यान, तरुणीचा या प्रेमास नकार असल्यामुळे महेंद्र तणावात राहत होता. ५ मार्च रोजी रात्री घरात कुणीच नसताना त्याने गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन स्वत:ला टोचून घेतले. यामुळे काही मिनिटातच तो बेशुद्ध पडला.

कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मध्यरात्री महेंद्रचा मृत्यू झाला, अशी माहिती महेंद्रचे मामा किशोर मोरे (रा. कुसंुबा) यांनी दिली. या प्रकरणी मृत महेंद्रचे भाऊ गजानन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---