जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । आर्थिक विवंचनेतून ४० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना रावेर तालुक्यातील पातोंडी येथे घडली असून किशोर श्रावण पाटील असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना :
पातोंडी येथे किशोर पाटील हे सकाळी स्वता:च्या शेतात गेले व तेथे काहीतरी विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. मयत किशोर पाटील यांना एक मुलगा असून तो ही कर्णबधीर आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक देखील घटना स्थळाकडे घाव घेतली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा कयास उपस्थित नागरीक लावत होते. याबाबत रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.