⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | कर्जबाजारील कंटाळून जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारील कंटाळून जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२४ । कर्जबाजारील कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना जामनेर तालुक्यातील लोंढरी बुद्रुक येथे उघडकीस आली. जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील लोंढरी बु. येथील जीवन भागवत हे गेल्या काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते. शेतीतून चांगले ऊत्पादन येत नसल्याने त्याला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातही त्यांना यश आले नाही. सततच्या नुकसानीने कर्ज फेडता येत नसल्याने त्यांनी अखेर (Farmer) शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली.

पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी बाराला अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्च्यात वृद्ध आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व वहिनी असा परिवार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.