---Advertisement---
जळगाव शहर निधन वार्ता

प्रौढाची राहत्या घरी गळफास आत्महत्या

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । कुसुंबा येथील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. किशोर चौधरी (वय ४५) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना १५ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता घडली. घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

crime

चौधरी हे एमआयडीसीतील एका दाल मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कामाला होते; परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते घरीच होते. १५ रोजी घरात कुणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान भावाची पत्नी ही घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---