जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । सोडा वॉटरची हातगाडी लावणाऱ्या तरुणाने नैराश्यातून २२ जुलै ला विष प्राशन केलं होत. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. पंकज दत्तात्रय कोल्हे (वय २९, रा. ज्ञानदेवनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पंकज कालिंका माता मंदिराजवळ सोडा वॉटरची हातगाडी चालवत होता. लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे तो आर्थिक विवंचनेत सापडला होता. सध्या व्यवसाय सुरू झाला असला तरी फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही दिवसांपासून तो नैराश्यात होता.
२२ जुलै रोजी त्याने मेडिकलवरून विषारी औषध आणून घरीच सेवन केले. यामुळे त्याची प्रकृती बिघडली. काही वेळातच तो बेशुद्ध झाला होता. कुटंुबीयंानी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पंकज हा तीन बहिणींचा एकुतला भाऊ हाेता.