---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाने संपविले जीवन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय. अशातच एका तरुणाने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे घडली असून मनोज राजेंद्र पाटील (वय-४०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

young man succied jpg webp webp

काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील मनोज राजेंद्र पाटील (वय-४०) हा तरूण वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला असून शेती व्यवसाय व खासगी नोकरी करून कुटुंबाची उपजीविका भागवित असे. मात्र अचानक तरवाडे शिवारातील आपल्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे.

---Advertisement---

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तत्पूर्वी सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचनामा केला. दरम्यान आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउपनि कुणाल चव्हाण हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---