⁠ 
सोमवार, मे 6, 2024

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊस खरेदीच्या दरात सरकारने केली सर्वाधिक वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२४ । आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने बुधवारी 2024-25 हंगामासाठी ऊसाची एफआरपी 25 रुपयांनी वाढवून 340 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली असून यात ऊसाची एफआरपी 25 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. ही वाढ मोदी सरकारने केलेली सर्वाधिक वाढ आहे. ऊसाचा जुना भाव 315 रुपये प्रतिक्विंटल होता. आता ऊसाची एफआरपी 25 रुपयांनी वाढल्यानंतर ते 340 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि योग्य किंमत मिळावी, यासाठी आगामी उसाच्या हंगामासाठी १ ऑक्टोबरपासून दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2024 ते 30 सप्टेंबर 2025 असा निर्णय घेण्यात आला आहे. 2024-25 या वर्षासाठी 340 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो मागील वर्षी 315 रुपये होता, तो वाढून 340 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. या वर्षी क्विंटल…” ठाकूर म्हणाले.