डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया! गुडघ्यात झालेली गाठ काढण्यात अस्थिरोग तज्ञांना यश
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । गुडघ्याजवळ झालेली गाठ काढण्याची आणि (कृत्रिम सांधा प्रत्यारोपण) (ट्यूमर प्रोस्थेसिस) दुर्मिळ शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील अस्थिरोग तज्ञांच्या कौशल्यामुळे यशस्वी ठरली आहे. या शस्त्रक्रियेनंतर आठवडाभरात रूग्ण पुन्हा त्याच्या पायाने चालू लागला आहे.
याबाबत माहिती अशी की, शरद सोनवणे (वय ३५, रा. जळगाव) या तरूणाच्या गुडघ्याजवळ सूज असल्यासारखे जाणवत होते. कालांतराने याठिकाणी गाठ असल्याचे दिसून आले. सहा वर्षापूर्वी उजव्या पायाच्या गुडघ्यावरची सूज वटाण्याच्या ऐवढी होती (१ से.मी ु १ से.मी ) हळूहळू तिचा आकार वाढत गेला. आकार वाढत जाऊन ती शेवटी संत्र्याच्या आकाराएवढी मोठी झाली. अशी सूज शरिरावर दुसरीकडे कुठेही नसून त्यासोबत ताप, वजन कमी होणे,किंवा सूजेसोबत दुखणे असे कुठलीही तक्रार नव्हती. यासोबतच त्यांना शुगर, बी.पी., टी.बी, अस्थमा अशा कोणतेही आजार नव्हता. त्यानंतर शरद सोनवणे यांच्यावर रूग्णालयात वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या.
यात रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या, सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, २ डीइको (पेटस्कॅन) करण्यात आला. तपासणी अंती लो ग्रेड सार्कोमा या आजाराचे निदान करण्यात आले. निदानानंतर अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर शस्त्रक्रिया करून गाठ काढून गुडघा प्रत्यापरोप करण्यात आले. ही शस्त्रक्रिया जवळपास ६ तास चालली. अवघ्या आठवडा भरात शरद सोनवणे हे त्यांच्या पायाने पुन्हा चालू लागले आहे.
या शस्त्रक्रियेसाठी अस्थिरोग तज्ञ, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. दिपक अग्रवाल, डॉ. चांडक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व शस्त्रक्रिया यशस्वी केली.या शस्त्रक्रियेसाठी ऑनकोसर्जन डॉ. निलेश चांडक, तसेच अस्थिरोग विभागातील डॉ. प्रसाद बांबरसे, डॉ. चाणक्य, डॉ. अंकित भालेराव, डॉ. वेदांत पाटील, भूलतज्ञ विभागातील डॉ. सतिश, डॉ. श्रध्दा गवई, डॉ. हेमंत मापारी, डॉ. आकांक्षा पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.