कुटुंबात कुणीच सदस्य नसल्याने स्टेमसेलकरीता डोनर रजिस्ट्रीच्या माध्यमातून दात्याचा शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नांतून दाता उपलब्ध झाला. मात्र शस्त्रक्रियेच्या आधी दात्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याने स्टेमसेल देण्यास नकार दिला. या आव्हानात्मक परिस्थितीत सुदैवाने चुलत बहिणीचे वैद्यकीय नमुने जुळले. व तिच्या माध्यमातून रुग्णाला स्टेमसेल उपलब्ध झाले. नुकताच यशस्वी उपचारादरम्यान रुग्णाला घरी सोडले असून, आता तो सामान्य जीवन जगू शकणार असल्याचे डॉ.रजत बजाज यांनी सांगितले. रुग्णालयातील
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल
युवा अभियंत्याच्या जीवनात डॉ.रजत बजाज, डॉ.सुदर्शन पंडित, सहाय्यक सचिन राठोड यांच्यासह टीमच्या अथक परीश्रमातून नवी उमेद निर्माण झाली आहे.. कोविड काळात ४० बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणारे एच सी जी मानवता कॅन्सर सेन्टर हे उत्तर महाराष्ट्रातील अद्यावयात एकमेव हॉस्पिटल आहे.