जळगाव शहर

ड्युएथलॉन स्पर्धेत डॉ.अनघा चोपडेंचे यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ड्युएथलॉन स्पर्धेत गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. अनघा चोपडे यांनी विजेतेपद मिळवले.

या स्पर्धेमध्ये २० किलोमीटर सायकल चालवणे, ५ किलोमीटर धावणे आणि १० किलोमीटर राईड करणे अनिवार्य होते. या क्रमानुसार सलग स्पर्धा पूर्ण करावी लागते. ड्युएथलॉन स्पर्धेत २५ ते ४० वर्ष महिला गटात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.अनघा सुयोग चोपडे ह्या विजेत्या ठरल्या. त्यांनी १ तास ५७ मिनिटाच्या कालावधीत स्पर्धा पूर्ण केली. त्याबद्दल स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ.अनघा चोपडे यांचा गौरव करण्यात आला. ड्युएलथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचा डॉ.चोपडे यांचा पहिलाच प्रयत्न होता, त्यात त्यांनी यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण करुन यश संपादन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button