---Advertisement---
गुन्हे रावेर

दुर्दैवी ! अ‍ॅपेरिक्षा व मालवाहू रिक्षाच्या धडकेत सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, पाच जण जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । फैजपूर ते आमोदा रस्त्यावर अ‍ॅपेरिक्षा व मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ मे रोजी घडली. आदिती सोपान खडसे (वय १३) असं मयत विद्यार्थिनीचे नाव असून या अपघातात पाच जण जखमी झाले.

svd ac

या घटनेबाबत असे की, सावदा येथून भुसावळला प्रवासी वाहतूक करणारी अपे रिक्षा (क्र.एमएच.१९-सीव्ही. ३५९०) सातवीतील विद्यार्थी सार्थ शंतनू सरोदे(गणेश आयुर्वेदिक क्लिनिकचे संचालक डॉ. शंतनू सरोदे यांचा मुलगा), ओझल संदीप पाटील ( शिक्षक संदीप पाटील यांची मुलगी), आदिती सोपान खडसे (दंतरोग तज्ञ डॉ. सोपान खडसे यांची मुलगी) यांच्यासह इतर प्रवाशांना घेऊन भुसावळकडे निघाली. पिंपरुड फाटा ते आमोदा दरम्यान समोरून लाकडे घेऊन येणाऱ्या मालवाहू अॅपेरिक्षाने (क्र.एमएच.१९-७०६४) ने त्यांना धडक दिली. या अपघातात आदिती खडसे या विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ओझल संदीप पाटील, साथ सरोदे, प्रवासी रिक्षाचालक प्रभाकर ओतारी (२९, सावदा) हे जखमी झाले.

---Advertisement---

अपघातात मृत व जखमी विद्याथ्यर्थ्यांनी गेल्या वर्षीपासून भुसावळ येथील ‘पेस आयआयटी इन्सिट्यूशन’ या खासगी शिक्षण संस्थेत IIT, JEE आणि NEET च्या तयारीसाठी शिकवणी लावली आहे. ते संस्थेच्या फैजपूर येथील शाखेत शिकवणीला जातात. यंदाचे त्यांचे दुसरे वर्ष आहे. मात्र, १ मे ते १५ मे या काळात भुसावळ येथील शाखेत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा शिबिरासाठी तेतीन दिवसांपासून भुसावळात येत होते. आज त्यांचा भुसावळला जाण्याचा चौथा दिवस होता. मात्र, दुपारी
अपघात झाला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment