नववीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

ऑक्टोबर 9, 2023 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२३ । दररोज आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून यात आता किशोरवयीन मुलांचीही त्यात भर पडत चालल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान रावेर तालुक्यातील केऱ्‍हाळे बुद्रुक येथे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

kuhala news jpg webp

नंदिनी दीपक महाजन (वय १५, रा. केऱ्हाळे बु. ता. रावेर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेने परिरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, नंदिनीच्या आत्महत्यामागील कारण समजू शकले नसून याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

Advertisements

केऱ्हाळे बु. येथे नंदिनी दीपक महाजन ही तिची आईची आई अर्थात आजीसोबत राहत होती. तिचा मामा एक वर्षांपूर्वी वारला आहे. तर आई लहानपणापासूनच विभक्त झाली असून वडील दीपक यांचे निधन झालेले आहे. ती केऱ्हाळे गावात दत्तू सोनजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती. तिची आजी निर्मला भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करून दोघांचे पोट भरत होती. शनिवारी आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला दरवाजे बंद आढळले.

Advertisements

त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात नंदिनी हिने गळफास घेतल्याचे दिसले. तेव्हा तिने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी नंदिनीला रुग्णालयात दाखल केले. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार करीत आहे. दरम्यान, नंदिनी हुशार होती. मनमिळावू, गोंडस मुलगी होती. मात्र तिने अचानक आत्महत्या करण्याचे कारण काय हा आता तपासाचा भाग आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now