---Advertisement---
रावेर

वडगाव शिवारात केळीचे घड कापून फेकले ; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । चिनावल – वडगांव शिवारातील शेतकऱ्यांची केळी खोडे कापल्याने मोठा वाघोदा येथील रावेर अंकलेश्वर महामार्गावर परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी आंदोलनास्थळी ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली.

vadgaon jpg webp webp

वारंवार रावेर तालुक्यातील अनेक गावांत केळी खोड कापून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. वडगाव शिवारात केळीचे घड कापून फेकल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी पोलिस प्रशासनान आंदोलन स्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय जालिंदर पळे, पीएसआय अन्वर तडवी, फैजपूरचे एपीआय सिध्देश्वर आखेगांवकर, निंभोरा पोस्टेचे एपीआय गणेश धुमाळ, रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे, एपीआय शितलकुमार, नाईक पोलिस कर्मचारी तीन दंगा नियंत्रक पथकासह लक्ष ठेवून होते.

---Advertisement---

दरम्यान आ. शिरीष चौधरी यांनी नुकसानग्रस्त शेतात जाऊन तेथे पहाणी केली व शेतकऱ्यानची कैफियत ऐकून घेतली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---