जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२। एकीकडे महापरिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असताना ज्या बस सुरु आहेत त्यावर होणारे हल्ले देखील थांबत नाही. शुक्रवारी गाडेगाव घाटात रात्री ८ वाजता शिवशाही बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच.१८.बीजी.८७१ ही औरंगाबाद येथून जळगावकडे येत असतांना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फुटून नुकसान झाले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बसवाहतक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (वय-२८) रा. हिंगोणा ता.चोपडा यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गफुर तडवी करीत आहे.
हे देखील वाचा :
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना
- ऑनलाईन नंबर शोधणे पडले महागात; तरूणाला १० लाखात गंडविले