⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | धानोऱ्यात दुर्गा विसर्जन मिरवणुकीला गालबोट, दगडफेकीत चौघे जखमी

धानोऱ्यात दुर्गा विसर्जन मिरवणुकीला गालबोट, दगडफेकीत चौघे जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील दुर्गा विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना घडली. दुर्गा विसर्जनदरम्यान काही दुर्गा मंडळात गुलाल फेकण्याच्या वादावादीवरून दगडफेक करण्यात आली. यात तीन जण गंभीर जखमी झाले तर एक जण किरकोळ जखमी झाला. मागील तीन वर्षात विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीची ही दुसरी घटना आहे.

गावात तेरा दुर्गा मंडळ विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सतपंथ ज्योत मंदिर परिसर व गांधी चौक भागात गुलालाची उधळण सुरू असताना वाद झाले. त्यावरून दगडफेक करण्यात आली. यात किशोर चौधरी, मंथन दिनकर चौधरी, चेतन महाजन हे गंभीर जखमी झाले तर मुस्तफा तडवी ये किरकोळ जखमी झाले. यातील गंभीर जखमी यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले.

यावेळी गावात पळापळ सुरू झाल्याने महिला प्रचंड भयभित झाल्या. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.