---Advertisement---
जळगाव जिल्हा अमळनेर पारोळा

पारोळा-अमळनेर दरम्यान बसवर दगडफेक, चालक जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । पारोळ्याहून अमळनेरकडे येणाऱ्या बसवर (क्र. एमएच ४० एन ९०८२) अज्ञात दोन जणांनी  दगडफेक केल्याची घटना  ८ रोजी दुपारी १२ वाजता तपोवन रत्नापिंप्रीजवळ घडली. यात बसचालक रवींद्र सुरसिंग पाटील हे जखमी झाले. घटनेनंतर बस पारोळा पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

एसटी वर दगड फेक jpg webp

दरम्यान, दगडफेक होताच बस थांबली आणि दगडफेक करणारे मोटारसायकलने पसार झाले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---