अमळनेरचा दगडी दरवाजा पावसामुळे पडला
जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२१ | राज्यासह जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान होत आहे. याचा प्रत्यय अमळनेर मध्ये देखील बघायला मिळत आहे. अमळनेर ची प्राचीन ओळख असलेला दगडी दरवाजा पडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे अमळनेर शहरातील दगडी दरवाजा ढासळला आहे. हा दरवाजा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो. यामुळे या दरवाज्याची डागडुजी करणे अशक्य आहे. पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक दरवाजामधून वाहतूक बंद करावी असे आदेश दिले होते मात्र त्या आदेशांना केराची टोपली दाखवण्यात आली होती. ज्याच्या प्रत्येक म्हणून हा दरवाजा आता पडायला सुरुवात झाली आहे.
पुरातत्त्व विभागात यांच्यामार्फत या दरवाजाची डागडुजी करणे अशक्य आहे म्हणून हा दरवाजा आता पुनर्निर्माण समितीकडे हस्तांतरित करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत असे न झाल्यास तीव्र आंदोलन करू असेही यावेळी नागरिकांनी सांगितले.