⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अन्यायकारक दंड रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

अन्यायकारक दंड रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । रिक्षा हि पोट भरण्याचे साधन आहे दंड भरण्याचे माध्यम नव्हे तीनचाकी रिक्षाचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनास वाढीव शुल्कवाढ तसेच फिटनेस विलंबाचे ५० रुपये रद्द करणे बाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांना महाराष्ट्र रिक्षा पंचायत तर्फे निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकार, राज्य सरकारचे लागू केलेले दर महिना, तीन महिना, दरवर्षी वाहनांचे कर, विमा पालिसी, पी.यू सी,(Driving Licence) असे सर्व प्रकारचे कर भरत असतात हे सर्व बाबीमुळे वाहनधारकावर दररोज ५०/- रुपये दंडाचा बोजा आहे. हा बोजा वाहन धारक सहन करणार नाही. असंघटीत क्षेत्रात काम करणारे गोरगरीब वाहन धारकांवर अन्याय आहे आणि हा अन्याय महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटना होऊ देणार नाही. म्हणून आमची मागणी आहे की, या सर्व बाबीचा विचार करून विविध सर्व वाढीव शुल्कास आमची हरकत आहे. परिवहन विभागाच्या ऑनलाईन (Vahan .४.०) या पोर्टल मध्ये रिक्षाची सर्व शुल्क वाढ त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटने तर्फे केंद्र सरकारविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.

सदर निवेदनावर शहर अध्यक्ष अस्लम मुख्तार शेख यांच्यासह इरफान शेख, अफसर अ हमीद, शे नवी शे करीम कुरेशी, शे नासीर शे मुसा, मोहम्मद रफिक शे निजामोद्दिन, किरण दाभाडे, फारूख मेहबूब तडवी, शेख मुस्ताक शे मुनशी, शे अमीर नबी कुरेशी, दिनेश सोनावणे,संजय शिंदे, संजय पाटील यांच्या सह आदींच्या सह्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.