जळगाव शहर

PET परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत जिल्हाधिकारी व प्रकुलगुरुंना “मासु” च्या वतीने निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अतंर्गत पीएच.डी ची PET परीक्षा ही परीक्षा केंद्रावर घेण्यात येत असते. 2021-22 च्या पीएच.डी पूर्व परीक्षा PET ही परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकारी यांना कळताच जळगाव येथील संघटनेचे पदाधिकारी दिपक सपकाळे व संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रकुलगुरू यांची भेट घेत निवेदन दिले.

प्रकुलगुरू महोदयांना निवेदन देताच प्रकुलगुरू यांनी यावर सांगितले की, ही पीएचडी ची PET परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच यावे लागेल.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देखील दिले निवेदन
पीएचडी ची PET परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना देखील महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात देखील पीएच.डी PET परिक्षा ही परिक्षा केंद्रावर न घेता विद्यार्थी असेल त्या ठिकाणावरुन परिक्षा घेण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्र मधील कोरोनाची स्थिती सर्वांना न्ह्यातच आहे. त्यात ओमिक्रॉन हा ही नवा व्हेरियंट ने थैमान घातले असून आपल्या येथील पीएच.डी PET च्या परीक्षेसाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येत असतात. जिल्ह्यात आधिच कोविड 19 आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे, दररोज ४०० च्या वर आकडे समोर येत आहे. बस सेवा देखील बंद आहे. हा ही खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांन समोर आहे.

परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होऊन कोविड-१९ चा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड-१९ चा फैलाव झाल्यास जबाबदार कोण? त्यामुळे सदर पीएच.डी PET परिक्षा ही ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थी असेल तिथुन परिक्षा घ्यावी या आशयाचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे सहसचिव दिपक सपकाळे व जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी जिल्हाधिकारी व प्रकुलगुरू यांना दिले आहे. यावर काय निर्णय होणार याकडे मात्र सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागुन आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button