⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | स्टेट बँकेची दीड कोटींची फसवणूक, बँकेच्या व्हॅल्यूअरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

स्टेट बँकेची दीड कोटींची फसवणूक, बँकेच्या व्हॅल्यूअरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बँकेच्या दोन अधिकृत व्हॅल्यूअरसह 17 कर्जदारांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, 23 मार्च 2018 ते 16 जून 2019 दरम्यान स्टेट बँक आनंद नगर शाखेत मॅनेजर म्हणून विशाल इंगळे तर  17 जून 2019 ते 28 डिसेंबर 2020 दरम्यान मॅनेजर म्हणून नंदलाल बाबूलाल पाटील होते. उभयंतांच्या कार्यकाळात बँकेची फसवणूक झाल्याची तक्रार झाल्यानंतर जळगावचे मुख्य प्रबंधक सुरेश सोनवणे यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यात स्टेट बँकेची एक कोटी 49 लाख 21 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवार, 7 रोजी भुसावळ स्टेट बँकेचे विद्यमान मॅनेजर बँकेचे मनोज प्रेमदास बेलेकर (सुदर्शन कॉलनी, नागपूर, ह.मु.भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार व्हॅल्यूअरसह 17 कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिसात १७ कर्जदारांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात आसीफ हुसेन गवळी (द्वारका नगर, भुसावळ), माजीद खान इद्रीस खान (भुसावळ), निलेश जय सपकाळे (बुद्धवाडा, कन्हाळा, ता.भुसावळ), पंकज भिकनराव देशमुख (पंचशील नगर, भुसावळ), राजेश निवृत्ती मेहरे (गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ), शोभा पोपट पगारे (यावल रोड, राहुल नगर, भुसावळ),  संदीप पुजाराम मैराळे (खडका, ता.भुसावळ), संतोष बबन सूर्यवंशी (रामदासवाडी, खडका रोड, भुसावळ), अफसाना बानो कलीम खान (द्वारका नगर, भुसावळ), गजानन रमेश शिंपी (नेब कॉलनी, भुसावळ),  शाह शकीर चंद (मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ), शशीकांत रमाकांत अहिरे (फुलगाव, ता.भुसावळ), शकील इमाम गवळी (कन्हाळे बु॥., ता.भुसावळ), शाह अरबाज शाह अब्बास (पंचशील नगर, भुसावळ), बँकेचे व्हॅल्यूअर समीर बेले (दुसरा मजला, रयल हब बिल्डींग, जिल्हा न्यायालय, मालेगाव), बँकेचे व्हॅल्यूअर अशोक दहाड (183, नवी पेठ, एमजी रोड टॉवरजवळ, जळगाव), कमलाबाई प्रकाश बोरसे (पीओएच कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.