---Advertisement---
रावेर

रावेरसह सावद्यातील म्हैशीचा बाजार त्वरित सुरू करा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नियमितपणे, रितसर म्हैस खरेदी विक्री बाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी म्हैशी खरेदी-विक्री व्यापारी व तालुक्यातील दुग्धव्यवसायिक, दुध उत्पादक शेतकरी यांनी संबंधितांकडे केली आहे.

jalgaon 2022 11 21T150324.917

रावेर -सावदा परिसरात मोठ्या संख्येने दुध उत्पादक शेतकरी, दुध उत्पादक व्यावसायीक तसेच म्हैसीची मोठ्या संख्येने खरेदी विक्री करणारे लहान छोटे, मोठें व्यवसायिक व या व्यवसायांवर आधारित रिक्षा, गाडी चालक यानाही मोठ्या प्रमाणावर आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रावेर – सावदा येथील म्हैशीची, गुरांची खरेदी-विक्री बाजार तात्काळ सुरु करण्यात यावा. कारण यामुळे बहुतेक म्हैस खरेदी विक्री व्यापारी यांनी या व्यवसायांवर होणारी उलाढाल ठप्प झाली असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने त्यांचे बरेचसे व्यवहारात कोंडी झाली आहे.

---Advertisement---

याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्यांच्यांत नैराश्य आले असून ते पुर्णपणे हतलब झाले आहेत, आर्थिक टंचाई, बेरोजगारी, नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा समतोल बिघडला आहे, यामुळे राज्य सरकारने त्वरित म्हैस खरेदी विक्री बाजार सुरू करावा आणि या व्यवसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, यांची मानसिकता मजबूत करण्यासाठी, आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी, दुग्ध उत्पादनाकांची व्यथा, समस्या, दुध खरेदी सर्व सामान्य ग्राहक व नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी, शासनाने, राज्यकर्ते यांनी निदान म्हैस खरेदी विक्री बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.

यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नातही भर पडले, आणि लंम्पी आजारांचे प्रमाण सुध्दा आता कमी झालेले दिसून येत आहे. म्हणून शासनाने लवकरात लवकर फेर विचार करून म्हैस खरेदी विक्री बाजार समितीच्या आवारात नियमितपणे रितसर शासनाच्या नियमानुसार म्हैशीचा बाजार सुरू करावा.अशी मागणी म्हैशी खरेदी-विक्री व्यापारी व तालुक्यातील दुग्धव्यवसायिक, दुध उत्पादक शेतकरी यांच्याकडून होत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---