जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । शेतकी संघाच्या माध्यमातून शेतक-यांच्या ज्वारी मका,व गहू खरेदी करण्यासाठी भडगाव मधील शेतक-यांनी ज्वारीसाठी १०६२,मकासाठी,५६० गहू १२ शेतक-यांनी नाव नोंदणी केली आहे.
प्रत्यक्षात खरेदीसाठी आजपावेतो खरेदी केंद्र सुरूवात झाली नाही शेतक-यांचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यांच्या पूर्व तयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणा-या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असते माञ खरेदी सुरू नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.खरीप पीकांची पेरणी पंधरा दिवसाच्या अवधीवर येऊन ठेपली आहे खरीप पीकाची पूर्व तयारी म्हणून शेतशिवारातील मशागतीची कामे पूर्ण झाली असून खरेदी केंद्र सुरू कधी होईल.
याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हतबल व हवालदिल झाला आहे भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतक-यांनी खरेदीसाठी आॅफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केले असून आॅनलाईन प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून शेतकरी बांधवांची नाव नोंदणी करून घेता येईल तात्काळ खरेदी केंद्र सुरू करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली.