---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र

एसटी प्रवास महागला ; जळगावहून आता मुंबई, नाशिक, पुण्यासाठी ‘इतके’ लागेल तिकीट भाडे..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ (State Transport Corporation in Maharashtra) अर्थात एसटी बसेसच्या तिकीट (ST Ticket) दरात आजपासून वाढ लागू झाली आहे. एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून बस प्रवासात १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केली असून यामुळे प्रवाशांच्या (Passengers) खिशाला मोठा भार पडणार आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ (Rent Increase) झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित ही वाढ करण्यात आली. ST ticket price hike in Maharashtra

ST

आता जळगावहून मुंबई, नाशिक, पुणे संभाजीनगरसाठी लागणार इतके रुपये?
एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी, शिवनेरी (Shivneri) , शिवशाही (Shivshahi) बस प्रवासाच्या दरात वाढ झाली आहे. जळगावहून आता मुंबईसाठी (Mumbai) १३१ रूपये वाढ झाल्याने एक हजार रूपये भाडे लागेल. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) भाड्यात ३७ रूपये वाढ झाली असून २४५ ऐवजी २८२ रूपये मोजावे लागतील. पुणे (Pune) जाण्यासाठी पूर्वी ६०० रूपये भाडे लागायचे. आता ६९० रूपये लागतील.

---Advertisement---

नाशिकला (Nashik) बडनेरा मेमू रेल्वेने जाण्यासाठी ५० रूपये भाडे आकारले जाते. परंतु हाच प्रवास एसटीने करण्यासाठी आता ४३१ रूपये मोजावे लागणार आहेत. नाशिकच्या भाड्यात ५६ रूपये वाढ केली आहे. जिल्हांतर्गत चाळीसगावला (Chalisagaon) जाण्यासाठी मेमूने २५ रूपये खर्च येतो. परंतु एसटीच्या भाड्यात २२ रूपये ५० पैसे वाढ झाल्याने १७२ रूपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. पाचोरासाठी १२ रूपये वाढ केली असून ९० रूपये तिकीट लागेल. तर भुसावळसाठी पूर्वी ४५ रूपये तिकीट लागायचे आता ५२ रूपये एसटी भाडे लागणार आहे. एकंदर जिल्ह्यात सर्वात कमी वाढ ही एरंडोल व धरणगावच्या भाड्यात अर्थात ८.२५ रूपये झाली आहे. मुक्ताईनगर व चोपड्यासाठी प्रत्येकी १४.२५ रूपये वाढ झाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---