⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव जिल्ह्यात तुमच्या गावात येत नाही एसटी ? तर नक्की वाचा ही बातमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही एसटी प्रवासांचे हाल होतच आहेत. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये एसटीची येजा करण्याची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना एसटीची सोय घेता येत नाहीये. नागरीकांना खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. अश्यावेळी नागरिकांना नक्की काय करावे? हे माहीत नसते. यासाठी एसटी प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी जर एकाद्या ग्रामीण भागात एसटी जात नसेल तर तिथल्या नागरिकानीं प्रशासनाकडे याची मागणी करावी जेणेकरून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ग्रामीण भागात बसेस सुरु केल्या जातील. असे प्रशासनाने सांगितले.

नागरिकांनी जर एसटी प्रशासनाला विनंती केली तर नागरिकांचे काम होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात जर एसटीची सोय होत नसेल तर लगेचच आगाराला त्या ठिकाणी एसटी सोडण्यात यावी असे सांगितले तर एसटी बसची सोय सुरू करेल असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अभूत्रपूर्व संपामुळे एसटी आर्थिक दृष्ट्या डबघाईला गेली होती. हळूहळू का होईना पण एसटी एका प्रकारे महाराष्ट्रात पुनर्जीवन घेत आहे. अश्यावेळी लांब पल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येत आहेत. ज्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान होत. असून त्यांना एसटीपासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांनी वेळोवेळी याबाबतचे निवेदन एसटी आगाराला दिले तर लगेचच त्या भागातली एसटी सुरू करण्यात येईल अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.