उद्या दहावी निकाल, कसा पाहाल निकाल?
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार १६ जुलै रोजी ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे.
यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानुसार उद्या शुक्रवारी बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल.
दहावीचा निकाल कुठे पाहणार?
निकाल कसा पाहाल ?
– निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जाईल.
– त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
– त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
– त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
– यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
– निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.