⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगावच्या तरुणांनो चला.. चालून आलीये केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । तुम्ही जर दहावी ते पदवी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ मेपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ जून २०२२ आहे. ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख १५ जून २०२२आहे आणि ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम तारीख १६ जून २०२२ आहे.

एकूण पदसंख्या : २०६५

या पदांसाठी होणार होणार?

1) नर्सिंग ऑफिसर
2) सिनियर रिसर्च असिस्टंट
3) टेक्निकल ऑफिसर
4) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
5) एग्रीकल्चर असिस्टंट
6) सिनियर टेक्निकल ऑफिसर
7) फार्मासिस्ट
8) लॅब असिस्टंट
9) स्टाफ कार ड्राइव्हर
10) मेडिकल अटेंडंट
11) केयर टेकर
12) डाटा प्रोसेसिंग असिस्टंट
13) फोटो आर्टिस्ट
14) फील्ड अटेंडंट
15) रिसर्च असोसिएट
16) टेक्निकल असिस्टंट
17) सर्व्हेअर
18) टेक्निकल ऑपरेटर
19) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
20) मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

अर्ज कसा करायचा
ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
नोंदणी करा आणि पोर्टलवर लॉग इन करा.
-फेज X 2022 परीक्षेसाठी अर्ज करा.
-तपशीलांमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा.
फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
इच्छुक उमेदवार तपशीलवार सूचना येथे पाहू शकतात.

परीक्षा (CBT): ऑगस्ट 2022

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा