---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र शैक्षणिक

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.

ssc hsc

वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ते १० फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

---Advertisement---

म्हणून परीक्षा लवकर
यावेळी राज्य मंडळाच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर होत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा होतात. निकाल मे- जूनमध्ये लागतो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होते. यात जाणारा वेळ, अभ्यासासाठी वेळ मिळणे, प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---