---Advertisement---
नोकरी संधी

10वी पाससाठी गुडन्यूज! GD कॉन्स्टेबलच्या 39481 जागांसाठी भरती सुरु

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशसेवा करण्याची 10वी पास असलेल्या तरूणांकडे मोठी संधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशनने सर्वात मोठ्या भरतीपैकी एक, कॉन्स्टेबल GD च्या 39481 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे.SSC GD Bharti

SSC GD

ही भरती प्रक्रिया BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB विभागांमध्ये केली जाईल. इच्छुक उमेदवार SSC ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. SSC GD Recruitment 2024

---Advertisement---

पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
रिक्त पदांचा तपशील आणि पदसंख्या
1) सीमा सुरक्षा दल (BSF) 15654
2) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 7145
3) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) 11541
4) सशस्त्र सीमा बल (SSB) 819
5) इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) 3017
6) आसाम रायफल्स (AR) 1248
7) सचिवालय सुरक्षा दल (SSF) 35
8) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) 22

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट काय?
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे. 1 जानेवारी 2025 रोजी वयाची गणना केली जाईल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत कोणतीही सवलत नाही, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेचे चार टप्पे असतील:
पहिल्या टप्प्यात संगणकावर आधारित परीक्षा होणार असून त्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी या विषयांचे प्रश्न असतील.
दुसऱ्या टप्प्यात शारीरिक क्षमता चाचणी होईल, ज्यामध्ये पुरुषांसाठी 5 किमी धावणे आणि महिलांसाठी 1.6 किमी धावणे समाविष्ट आहे.
तिसरा टप्पा शारीरिक मानक चाचणी असेल, ज्यामध्ये उंची, छातीचे मापन आणि व्हिज्युअल मानकांचा समावेश आहे.
चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी होणार आहे. जे उमेदवार सर्व टप्पे पार करतात तेच अंतिम निवडीसाठी पात्र मानले जातील.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2024
परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2025

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---