⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

प्रतिक्षा संपली! महाराष्ट्र बोर्डाकडून 10वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १२वी परीक्षेचा निकाल २१ मे रोजी लागला. यानंतर बोर्डाचा दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालक आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच बोर्डाने इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली. येत्या २७ मे २०२४ रोजी दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाने दिली आहे.

दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.