जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. अशातच दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा बारावीचा निकाल १० मेच्या आधी लागेल, तर दहावीचा निकाल १५ मेच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. बोर्डाकडून यंदा निकालाची डेडलाईन पाळण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झालेय. त्यामुळे वेळेत निकाल लागू शकतो.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल यंदा वेळेआधी जाहीर करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. निकाल लवकर लागण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा १० ते १५ दिवल लवकर घेण्यात आल्या आहेत. दरवर्षीपेक्षा आधीच परीक्षा घेण्यात आल्या आहत, त्यामुळे निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागू शकतो.