⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | गोदावरीच्या श्रीवत्स निगम याची न्यूयॉर्क यूएसए येथे मास्टर ऑफ सायन्स (एम एस) साठी निवड

गोदावरीच्या श्रीवत्स निगम याची न्यूयॉर्क यूएसए येथे मास्टर ऑफ सायन्स (एम एस) साठी निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकीतील संगणक विभागाचा श्रीवत्स निगम ची मास्टर ऑफ सायन्स एम.एस. अभ्यासक्रमासाठी नुकतीच निवड झाली आहे.

श्रीवत्स हा परदेशात प्रवेश मिळवण्यासाठी पहिल्यापासूनच प्रयत्नशील होता. त्याने अमेरिकेतील विविध विद्यापीठातील महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. त्यापैकी आई इ एल टी एस या प्रोइफिशियन्सी टेस्ट मध्ये त्याने दैदीप्यमान यश संपादन केले. त्यामुळे त्याला बिंगहॅमटन स्टेट युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, यूएसए येथे सिस्टीम सायन्स या मास्टर ऑफ सायन्स (एम एस) प्रोग्राम साठी प्रवेश मिळाला.श्रीवत्स निगमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन व सत्कार केला.

कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), प्रा.निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख) डॉ. नितीन भोळे (बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटीज प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स प्रमुख), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) तसेच प्रा. निलेश चौधरी, प्रा. प्रशांत शिंपी हे उपस्थित होते. श्रीवत्सच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य) तसेच डॉ. वैभव पाटील (डी. एम. कार्डिओलॉजी) यांनी अभिनंदन करून कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.